आजची तरुणाई उद्याचे आरोग्य – डॉ. वैशाली वाघमारे
इचलकरंजी
दत्ताजीराव कदम आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, इचलकरंजी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनाच्या अनुषंगाने एड्स जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत महाविद्यालय परिसरात पदयात्रा काढण्यात आली तसेच विद्यार्थ्यांसाठी पोस्टर मेकिंग व रिल्स मेकिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आजची तरुणाई उद्याचे आरोग्य असून युवकांनी स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी ओळखून निरोगी जीवनशैली अंगीकारली पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. वैशाली वाघमारे यांनी केले. एड्सविषयी योग्य माहिती घेऊन गैरसमज दूर करणे आणि समाजात जनजागृती करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. खाडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक डॉ. सुनील भोसले, डॉ. अजिंक्य पत्रावळे, प्रा. संदीप पाटील, श्री. निलेश जाधव, प्रा. रोहित सदलगे आदी मान्यवर उपस्थित होते. पोस्टर मेकिंग व रिल्स मेकिंग स्पर्धांचे परीक्षण डॉ. स्वप्नजीत मुळीक, डॉ. सुनील भोसले व डॉ. निलोफर शेख यांनी केले. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. पोस्टर मेकिंग स्पर्धेत मुस्कान मुल्ला हिने प्रथम, सिद्धी खांडेकर हिने द्वितीय तर प्रीती भिसे व सानिका यादव यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकावला. रिल्स मेकिंग स्पर्धेत अर्शद पाथरवट याने प्रथम, आरती कणके हिने द्वितीय तर तुषार कोंडेकर याने तृतीय क्रमांक मिळवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप पाटील यांनी केले.
विविध स्पर्धातील बक्षिस वितरण करताना डॉ वैशाली वाघमारे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




