ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर माध्यम प्रमाणन संनियंत्रण समिती व मिडिया कक्षाची स्थापना

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर माध्यम प्रमाणन संनियंत्रण समिती व मिडिया कक्षाची स्थापना

इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महानगरपालिका स्तरावर माध्यम प्रमाणन संनियंत्रण समिती तसेच मिडिया व संपर्क व्यवस्थापन आणि सोशल मिडिया कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
निवडणूक अधिकारी तथा आयुक्त पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय माध्यम प्रमाणन संनियंत्रण समिती कार्यरत करण्यात आली असून, या समितीत पोलिस अधीक्षकांचे प्रतिनिधी शिवाजी गायकवाड (पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस स्टेशन), उपायुक्त अशोक कुंभार, निवडणूक निर्णय अधिकारी तथा आचारसंहिता कक्ष प्रमुख माधुरी परीट आणि माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे यांचा समावेश आहे.
या समितीकडून उमेदवारांच्या निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातींचे प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. प्रमाणीकरण केल्याशिवाय कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही. यासाठी महानगरपालिका मुख्य कार्यालयात मिडिया व संपर्क व्यवस्थापन व सोशल मिडिया कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
महानगरपालिका निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांनी आपल्या प्रचारासाठी आवश्यक असलेल्या जाहिराती या समितीकडूनच प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा