ICHMH51NEWS.IN
9921600800

बेपर्वा डंपर चालकाकडून धडकेने दुचाकीस्वार जखमी.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बेपर्वा डंपर चालकाकडून धडकेने दुचाकीस्वार जखमी.

इचलकरंजी:
रांगोळी गावात डंपरची धडक बसून दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी तानाजी रामचंद्र फराकटे (वय ५९) रांगोळी, ता. हातकणंगले) हे सोमवारी सकाळी रांगोळी येथील एमएसईबी ऑफिससमोरून आपल्या होंडा अ‍ॅक्टीव्हा (क्र. MH09 CZ 3976) या दुचाकीने जात असताना डंपर क्र. MH10 Z 3465 वरील अज्ञात चालकाने बेफिकीरपणे व हयगयीने वाहन चालवत पाठीमागून धडक दिली. या धडकेत फिर्यादी जखमी झाले असून त्यांना कोल्हापूर येथील अँस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेचा अहवाल राजारामपुरी पोलिसांकडून प्राप्त झाल्यानंतर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक मुजावर हे करीत आहेत, तर पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे.

 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा