ICHMH51NEWS.IN
9921600800

श्रीमंत गंगाबाई माईसाहेबांची ६८ वी पुण्यतिथी उत्साहात; महिलांच्या सबलीकरणाच्या कार्याला अभिवादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीमंत गंगाबाई माईसाहेबांची ६८ वी पुण्यतिथी उत्साहात; महिलांच्या सबलीकरणाच्या कार्याला अभिवादन

इचलकरंजी:
इचलकरंजी संस्थानच्या समाजकार्यासाठी समर्पित व दूरदृष्टी लाभलेल्या सुविद्य जहागीरदारपत्नी श्रीमंत गंगाबाई माईसाहेब यांच्या ६८ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रम श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे उत्साहात व भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
श्रीमंत गंगाबाई माईसाहेब या इचलकरंजी संस्थानचे जहागीरदार श्रीमंत बाबासाहेब घोरपडे सरकार यांच्या सुविद्य व कर्तृत्वशील पत्नी होत. त्यांना समाजसेवेची अतूट भावना लाभलेली होती. संस्थानातील महिलांसाठी शिक्षण, सुविधा व सामाजिक प्रगतीची दारे उघडणाऱ्या अनेक उपक्रमांची निर्मिती त्यांनी केली. महिलांच्या सबलीकरणासाठी केलेल्या त्यांच्या कार्यामुळेच समाजात त्यांना प्रेमाने “माईसाहेब” या नावाने ओळखले जाते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नुकत्याच क्लास वन अधिकारी पदावर विराजमान झालेल्या आणि प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी मा. अपूर्वा भारती संजय पाटील उपस्थित होत्या. त्यांच्या तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. संगीत शिक्षिका सौ. रानडे मॅडम व विद्यार्थिनींनी सादर केलेल्या गंगामाई पुण्यस्मरण गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचा व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ. एस. जे. कुलकर्णी व सौ. पी. एस. कामत यांचा विशेष सन्मान झाला. पुण्यतिथी निमित्त देणगीदार तसेच माईसाहेब व प्रमुख पाहुण्यांचे चित्र रेखाटणारे कडाळेसर यांचाही गौरव करण्यात आला.
मुख्याध्यापिका सौ. ए. एस. काजी यांनी महिलांनी केवळ साक्षरतेपुरते न थांबता समाजात पुढाकाराने काम करावे, असा संदेश देत माईसाहेबांच्या कार्यप्रेरणेची उजळणी केली. प्रमुख पाहुण्या अपूर्वा पाटील म्हणाल्या, “मी या गंगामाईचीच लेक आहे. स्वप्न ठरवलं की त्यासाठी झटणं महत्त्वाचं,” असे सांगत विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी श्री. कृष्णाजी बोहरा होते. विविध स्पर्धांच्या विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन सौ. व्ही. डी. रावळ यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. एन. एम. कांबळे यांनी मानले.
कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, माजी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

श्रीमंत माईसाहेब यांना अभिवादन करताना चेअरमन कृष्णाजी बोहरा व पदाधिकारी,शिक्षक,विद्यार्थीनी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा