ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२५–२६  स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती उपक्रम

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२५–२६  स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती उपक्रम

इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या सन २०२५–२६ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी SVEEP (Systematic Voters’ Education and Electoral Participation) कमिटीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
त्या अनुषंगाने आज राणी बाग येथे तसेच रिंगण फिटनेस फाउंडेशनच्या माध्यमातून उपस्थित सर्व नागरिक, खेळाडू व ज्येष्ठ नागरिक यांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. या उपक्रमास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी उपस्थित खेळाडू व ज्येष्ठ नागरिकांनी “आम्ही नक्की मतदान करणार” अशा घोषणा देत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान नागरिकांचा उत्साह अत्यंत सकारात्मक व प्रेरणादायी असल्याचे चित्र दिसून आले.
या उपक्रमामध्ये नोडल अधिकारी  शंकर पवार तसेच सहायक नोडल अधिकारी  संजय शेटे व सचिन खोंद्रे यांनी उपस्थितांना मतदानाचे महत्त्व, मतदारांची जबाबदारी व लोकशाही मधील  सहभागाबाबत मार्गदर्शन केले.
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असून अशा जनजागृती उपक्रमांमुळे आगामी निवडणुकीत मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

मतदान जनजागृती अभियान राबवताना इमनपा अधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा