ICHMH51NEWS.IN
9921600800

भारतीय जनता पार्टी इचलकरंजी विधानसभेच्या वतीने मा.पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची १०१ वी जयंती साजरी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीय जनता पार्टी इचलकरंजी विधानसभेच्या वतीने मा.पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची १०१ वी जयंती साजरी

 

मा.पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आज त्यांची १०१ वी जयंती इचलकरंजी भाजपा शहर कार्यलय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. श्री.श्रीरंग खवरे पूर्व मंडल अध्यक्ष, श्री.शशिकांत मोहिते पश्चिम मंडल अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली जयंती साजरी करण्यात आली

देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची १०१ वी जयंती असून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. अटल बिहारी वाजपेयी यांनी भाजप पक्षाचे नेतृत्व तर केले आणि एक कुशल राजकारणी, पत्रकार, कवी व लेखक म्हणून ओळखल निर्माण केली. त्यांनी भारताला आर्थिक आणि सामरिकदृष्ट्या मजबूत केले आणि त्यांचे ‘पोखरण-२ अणुचाचणी’ व ‘कारगिल युद्धात’ नेतृत्व केले. “हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा” अशा शब्दांतून संपूर्ण देशाला जिद्द आणि राष्ट्रप्रेमाची शिकवण देणारे अजातशत्रू नेतृत्व म्हणजे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी. आज २५ डिसेंबर, त्यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश ‘सुशासन दिन’ साजरा करत आहोत असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे तज्ञ शिक्षक बाबासाहेब गणू गवळी यांनी व्यक्त केले.

त्यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त अटल स्मृती वर्ष अभियान निमित्त फोटो पूजन, दीपोत्सव, त्यांच्या विविध कवितांचे प्रदर्शन भरविणे, वीर बालदिवस असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

यावेळी महिला अध्यक्षा सौ.सीमा कमते, सौ.सपना भिसे, ग्रामीण अध्यक्ष श्रीमती पुनम भोसले, चिटणीस सौ.निता भोसले, सरचिटणीस सौ.रमा फाटक, सरचिटणीस सतिश पंडित, युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद बचाटे, नरसिंग पारिख, ज्येष्ठ नेते दीपक राशिनकर, महेश पाटील, दीपक कडोलकर, सौ.अलका विभूते, सौ.संगीता घोरपडे, सौ.अमिता बिरंजे, सौ.संगीता साळुंखे, सौ.सुवर्णा लाड, श्रीमती मंगल सुर्वे, भानुदास तासगावे, रमेश पाटील शंकर झित्रे, वसंत पवार, विजय कांबळे, सिद्धार्थ कांबळे, रमेश काजवे, चंद्रकांत इंगवले, महावीर कुरुंदवाडे, रवींद्र घोरपडे, फारुख बागेवाडी, शशिकांत कालेकर, केशव सणगर, प्रदिप कांबळे, देवदान साठे, भरत तमायचे, विजय पाटील, सुनिल साळुंखे, दिलीप हारगे, सुशांत बेडक्याळे, सुनिल ताडे, विजय वेदपाठक आदि पदाधिकारी उपस्थित होते.

स्व.अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन करताना भाजप पदाधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा