ICHMH51NEWS.IN
9921600800

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चा १४१वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चा १४१वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

इचलकरंजी
इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा १४१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा. शशांक बावचकर यांनी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून च्या कार्याचा आढावा घेतला त्याबरोबरच महानगरपालिकेतून काँग्रेस व समविचारी पक्षाच्या लोकांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. तसेच शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. संजय कांबळे व राहुल खंजिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपाध्यक्ष शशिकांत देसाई, अजित मिणेकर, चंद्रकांत मिस्त्री,, रविराज पाटील, अनिल पच्छिंद्रे, रवींद्र पाटील, सोहेल बाणदार, प्रवीण फगरे, तोसिफ लाटकर, अण्णा कांबळे, राजू काटकर, ताजुद्दीन खतीब, ओंकार आवळकर, ताहीर खलिफा, दिलीप पाटील, रवी वासुदेव, सुमित बाबर, रोहित कदम सौ बिस्मिल्ला गैबान, वेदिका कळंत्रे, विद्या भोपळे, नंदकिशोर जोशी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
केक कापून वाढदिवस साजरा करताना शशांक बावचकर,संजय कांबळे, राहुल खंजिरे,नंदकिशोर जोशी व काँग्रेस पदाधिकारी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा