ICHMH51NEWS.IN
9921600800

भाजप कडून उमेदवार यादी निश्चित,भाजप कार्यालयातुन एबी फॉर्म देण्यास सुरुवात.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भाजप कडून उमेदवार यादी निश्चित,भाजप कार्यालयातुन एबी फॉर्म देण्यास सुरुवात.

इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या संभाव्य यादी संदर्भात  भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत सविस्तर प्रभागनिहाय सकारात्मक चर्चा झाली.
इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने संभाव्य उमेदवारांची नांवे निश्चित झाल्याचे समजल्यानंतर निष्ठावंतांना डावलून काही चुकीच्या किंवा पक्ष विरोधी काम करणाऱ्यांना उमेदवारी दिल्याबद्दल पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून संतप्त सवाल उपस्थित करण्यात आले. त्यातून नाराजीचा सूर उमटू लागल्याने सर्व घटनांचा आढावा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी संभाव्य यादीला स्थगिती दिली. भाजपा उमेदवार निवडीसंदर्भात रविवारी मुंबईत तातडीचे बैठकही बोलविली होती. सदरची बैठक मुंबईऐवजी कोल्हापूर येथे घेण्यात आली.
भारतीय जनता पार्टीकडे प्रत्येक प्रभागातून इच्छुकांची संख्या लक्षणीय असून ६५ जागांसाठी तब्बल ४२९ जणांनी मागणी केली आहे. उमेदवारांच्या मुलाखती, प्रभागनिहाय सर्व्हे आणि विजयी होण्याची क्षमता या निकषावर अंतिम झालेली वादी प्रदेशकडे पाठविण्यात आली होती. त्यावर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होऊन जवळपास ९० टक्के यादी निश्चित झाली होती. त्यानुसार संबंधितांना तयारीला लागण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून प्रचंड रोष निर्माण झाला होता.
या सर्व पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापूरात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी पक्ष निरीक्षक मकरंद देशपांडे, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर आदी उपस्थित होते. बैठकीत १ ते १६ या सर्वच प्रभागनिहाय उमेदवार निवडीसंदर्भात पुनश्च सविस्तर चर्चा झाली. सर्व जागांबद्दलही सकारात्मक चर्चा झाली आहे. कार्यकर्त्यांनी कोणताही निर्णय घाई गडबडीत न घेता संयम बाळगावा, असे आवाहन आमदार राहुल आवाडे यांनी केले आहे.दरम्यान सायंकाळ पासून निश्चित उमेदवारांना एबी फॉर्म वाटप कार्यालयातुन सुरू करण्यात आले आहे.

चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचे छायाचित्र

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा