रोटरी प्रोबसचे कार्य समाज उपयोगी..श्री.प्रकाश दत्तवाडे यांचा वीरशैव को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार…
इचलकरंजी
श्रीयुत प्रकाश दत्तवाडे साहेब यांची वीरशैव को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल रोटरी एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब तर्फे क्लबचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रकाशराव सातपुते यांनी सत्कार केला. सत्काराला उत्तर देत असताना श्री. प्रकाशराव दत्तवाडे यांनी रोटरी प्रोबसचे कार्य समाजभिमुख असून समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व विविध समाज उपयोगी सेवा देण्यासाठी कटिबद्ध असून त्या आपण करत आहात याचा आम्हाला अभिमान वाटतो असे म्हटले. रोटरी प्रोबसच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश राव सातपुते यांनी प्रकाश दतवाडे हे रोटरीच्या कार्यास सतत सहकार्य करत असतात. सतत व्यस्त असून सुद्धा आपल्या क्लबला मार्गदर्शन व सहकार्य मिळत असते असे सांगितले. रोटरी भवन येथे हा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ज्येष्ठ अभ्यासक श्री. अशोक केसरकर साहेब यांचे वेध बदलत्या जगाचा या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. या विषयाचा मागोवा घेत असताना डिजिटल युगात माणसातला संवाद हरवत चालला आहे. नव्या जगात माणसात संवाद व दोन पिढ्यातील अंतर वाढले आहे. माणसांचे नैसर्गिक जगणे लोप पावले आहे. आपण सारे यंत्राचे गुलाम होत आहोत अशी खंत श्री अशोक केसरकर यांनी व्यक्त केली. याप्रसंगी प्रारंभी मान्यवरांचे स्वागत व व्याख्याते श्री अशोक केसरकर यांचा परिचय सेक्रेटरी किरण कटके यांनी करून दिला. प्रास्ताविक अध्यक्ष श्री सुनिल कोष्टी यांनी केले. यावेळी व्याख्यानानंतर डिसेंबर महिन्यांमधील वाढदिवस असलेल्या व नवीन सभासद झालेल्या सभासदांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांची ओळख माजी अध्यक्ष शिव बसू खोत यांनी करून दिली. यावेळी श्रीकांत कगळे यांचाही सत्कार करण्यात आला. आभाराचे कार्य सदस्य श्री सदाशिव काजवे यांनी पार पाडले. या कार्यक्रमास सह सेक्रेटरी सौ संगीता लडगे , ट्रेझरर जयश्री चौगुले, डी एम बिरादार ,काशिनाथ जगदाळे ,जयप्रकाश साळगावकर, डॉक्टर कुबेर मगदूम, जुगल किशोर तिवारी, रामचंद्र निमकर, अण्णासाहेब नंदाई, वैभव डोंगरे, मल्लिकार्जुन तेग्गी ,प्राजक्ता होगाडे, मनीषा कोष्टी, बाबासाहेब पाटील जांभळीकर, कैलास तिवारी, माया होगाडे, दिपाली कोळी, शोभन स्वामी, माधवी कुलकर्णी, हेमंत कवठे, शारदा कवठे, प्रदीप लडगे, बाबासाहेब हावले, शालिनी जगदाळे, भीमराव कोळवले, सदाशिव मेटे, सूर्यकांत बिडकर, लीलावती बिरादार, काशिनाथ टकले, शंकर लाखे सह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
प्रकाश दत्तवाडे यांचा सत्कार करताना प्रकाश सातपुते व सुनील कोष्टी व पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







