इमनपा निवडणुकीत युतीसह मैत्रीपूर्ण लढतीचा राष्ट्रवादीचा निर्धार,१२ जागा लढवणार
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२५-२६
च्या निवडणुकीत भाजपा, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीतून दोन जागांवर तर मैत्रीपूर्ण लढतीत १० जागांवर निवडणूक लढण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चा निर्धार. महायुतीतून प्रभाग क्र. १ अ) मधून सौ. दिपाली सचिन कांबळे व प्रभाग क्र.२ ड) मधून श्री. सुहास अशोकराव जांभळे यांना तर मैत्रीपूर्ण लढतीसाठी प्रभाग क्र.३ अ) मधून सौ. मानली मिथुन नंदुरकर, ३ ब) मधून श्री. शिवाजी उत्तम शिंदे, ३ क) मधून सौ. प्रियदर्शनी सुनिल बेडगे, ३ ड) मधून श्री. अशोकराव रामचंद्र जांभळे, प्रभाग क्र. ९ ब) मधून सौ. तनुजा आकाश माने, प्रभाग क्र.१० ड) मधून श्री. अमित सुरेश गाताडे, प्रभाग क्र.११ अ) मधून श्री. इस्माईल आब्बास समडोळे, ११ ब) मधून सौ. शबाना इस्माईल समडोळे, ११ क) मधून सौ. लक्ष्मी संजय बडे, ११ ड) मधून श्री. शशिकांत धोंडीराम देसाई यांना उमेदवारी देणेत आली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे नेते नामदार मा.श्री. हसनसो मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाने सर्व ताकदीने निवडणूक लढण्याचा निर्धार करणेत आला. याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष श्री.बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेस माजी आमदार श्री. अशोकराव जांभळे, इचलकरंजी शहराध्यक्ष श्री. सुहास जांभळे, कार्याध्यक्ष श्री. अमित गाताडे, सेवादल प्रदेश उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब देशमुख, के.डी.सी.सी. बँकेचे माजी संचालक श्री. आसिफ फरास, माजी नगरसेवक श्री. तौफिकभाई मुजावर, श्री. रमेश कांबळे यांचेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर करताना बाबासहेब पाटील आसुरलेकर,अशोकराव जांभळे, सुहास जांभळे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







