ICHMH51NEWS.IN
9921600800

शिवसेना उबाठा कडून १९ उमेदवार रिंगणात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवसेना उबाठा कडून १९ उमेदवार रिंगणात

इचलकरंजी:
इचलकरंजी महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिव-शाहू विकास आघाडी अंतर्गत जागा वाटपाबाबत वारंवार चर्चा होऊनही केवळ वेळकाढूपणा करण्यात आला. शेवटच्या क्षणी शिवसेनेस केवळ ३ जागा देण्याचा प्रस्ताव कळविण्यात आला. हा प्रस्ताव शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर व जनाधारावर अन्याय करणारा असल्याने तो स्वीकारार्ह नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख मा. श्री. संजय चौगुले यांनी पत्रकार परिषद घेऊन इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची ठाम भूमिका जाहीर केली.
त्यानंतर मिळालेल्या अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत पक्षाची संघटनात्मक यंत्रणा पूर्ण ताकदीने कार्यरत करण्यात आली. विविध प्रभागांमध्ये सक्षम, जनतेशी थेट संपर्क असलेल्या उमेदवारांशी चर्चा करून काही नव्या पक्षप्रवेशांसह उमेदवार उभे करण्यात आले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इचलकरंजी महानगरपालिकेसाठी एकूण १९ उमेदवारांना पक्षाचे अधिकृत AB फॉर्म देण्यात आले असून हे सर्व उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत, अशी माहिती जिल्हाप्रमुख मा. श्री. संजय चौगुले यांनी दिली.
शिवसेना ही केवळ सत्तेसाठी नव्हे तर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि स्वाभिमानाच्या राजकारणासाठी निवडणूक लढवत आहे. इचलकरंजीकरांनी शिवसेनेच्या या स्वबळाच्या लढ्याला भक्कम पाठिंबा द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा