इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे ५६ उमेदवार जाहीर
इचलकरंजी, ता. ३० डिसेंबर २०२५ :
इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ साठी भारतीय जनता पार्टीने आपले ५६ उमेदवार जाहीर केले आहेत. कोल्हापूर येथे उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उमेदवारांची अंतिम छाननी करून यादी निश्चित करण्यात आली. या प्रक्रियेत सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रदेश संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष व निवडणूक प्रमुख माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, आमदार डॉ. राहुल आवाडे तसेच जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक–निंबाळकर यांची उपस्थिती होती. सर्व प्रभागांमध्ये सर्वेक्षण, स्थानिक चर्चा आणि मुलाखतीनंतर उमेदवारांची ही अंतिम यादी निश्चित करण्यात आली असून निवड झालेल्या सर्व उमेदवारांना ए-बी फॉर्मचे वाटप करण्यात आले.
भाजपने जाहीर केलेल्या यादीनुसार पक्षाने महिलांना, मागास प्रवर्गांना आणि नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होत असून, पक्षाने विकासाभिमुख आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणारे पॅनेल उभे केल्याचा दावा केला आहे.
घोषित उमेदवारांमध्ये पुढील नावांचा समावेश आहे — रणजीत भीमराव अनुसे, मेघा दादासो भाटले, कृष्णनाथ उर्फ किसन परशराम शिंदे, शुभांगी प्रधान माळी, मंगल बंडोपंत कोदले (मुसळे), राजू गोरख कबाडे, डॉ. प्रियांका प्रसाद इंगवले, योगेश चांगदेव पाटील, राजू शंकर चव्हाण, मोनाली दत्तात्रय मांजरे, मनिषा संतोष कूपटे, मनोज भीमाशंकर हिंगमिरे, सतीश वसंत मुळीक, वैशाली सुनिल पोवार, सुनिल सातगोंडा पाटील, अलका अशोक स्वामी, किरण श्रीरंग खवरे, विजया सुनिल महाजन, विठ्ठल पुंडलिक चोपडे, प्रमिला रविंद्र जावळे, संजय मसाजी केंगार, रूपा उदय बुगड, पारीसनाथ मल्लू घाट, रुबेन सखाराम आवळे, ध्रुवती सदानंद दळवाई, मनिषा प्रशांत नवनाळे, उदय आनंदा धातुंडे, रवीसाहेब रजपुते, विद्या मनोज साळुंखे, तानाजी बाळू पोवार, प्रदीप नामदेव धुत्रे, वैशाली शशिकांत मोहिते, सारिका सुकुमार पाटील, राजू संभाजी बोंद्रे, नितेश किरण पोवार, सुरेखा अजित जाधव, स्नेहल दीपक रावळ, अनिलकुमार देवकरण डालिया (डाळ्या), रुपाली अनंत सातपुते, शशिकला म्हाळसाकांत कवडे, चंद्रकांत विष्णू शेळके, रणजीत दिलीप लायकर, सपना प्रमोद भिसे, मेघा शहाजी भोसले, अभिषेक रमाकांत वाळवेकर, ओंकार रामचंद्र सुर्वे, राजू आप्पासो पुजारी, ज्योती नागेश पाटील, तेजश्री अमृत भोसले, संतोष बाबुराव शेळके, पूनम सचिन माळी, सुशांत बाळासाहेब कलागते, शुभांगी किशोर पाटील, आरुणा प्रमोद बचाटे आणि अनिकेत बाबासो पाटील.अशी आहेत याबाबत माहिती
पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे आणि पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







