ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेत उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण,४४५ अर्ज वैध, ११ अर्ज अवैध

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेत उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण,४४५ अर्ज वैध, ११ अर्ज अवैध

इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाली असून ३१ डिसेंबर २०२५ रोजी प्राप्त झालेल्या अर्जांचा प्रभागनिहाय निकाल महानगरपालिका मिडिया व संपर्क व्यवस्थापन विभागाने जाहीर केला आहे. प्रभाग समिती कार्यालय अ येथे दाखल ११७ अर्जांपैकी २ अर्ज अवैध ठरले, तर प्रभाग समिती कार्यालय ब येथे दाखल १०३ अर्जांपैकी ५ अर्ज अवैध घोषित करण्यात आले. प्रभाग समिती कार्यालय क मध्ये दाखल ११२ अर्जांपैकी ३ अर्ज अवैध आढळले, तर प्रभाग समिती कार्यालय ड येथे दाखल झालेल्या १२४ अर्जांपैकी १ अर्ज अवैध घोषित झाला. याप्रमाणे एकूण ११ अर्ज अवैध तर ४४५ अर्ज वैध ठरल्याची माहिती प्रशासनाने दिली असून छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील निवडणूक कामकाज निश्चित कार्यक्रमानुसार राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा