इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक आय ए.एस. श्री. विशाल नरवाडे यांचेकडून निवडणूक कामकाजाचा आढावा
इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल नरवाडे, (भा.प्र.से.) यांची मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून
तसेच श्री. जीवन गलांडे यांची सहाय्यक निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या अनुषंगाने आज बुधवार दिनांक ३१ डिसेंबर रोजी मुख्य निवडणूक निरीक्षक विशाल नरवाडे आणि सहाय्यक निवडणूक निरीक्षक जीवन गलांडे यांनी इचलकरंजी शहरास भेट दिली.
आज चारही प्रभाग समिती कार्यालयात उमेदवारी अर्जांची छाननी असल्याने या ठिकाणी सुरू असलेल्या छाननीच्या कामकाजाची पाहणी करून आवश्यक त्या सुचना दिल्या.
त्याचबरोबर निवडणूक अधिकारी तथा आयुक्त पल्लवी पाटील यांचे समवेत महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त केलेले नियंत्रण अधिकारी ,नोडल अधिकारी , पोलिस अधिकारी यांचे समवेत बैठक घेऊन निवडणूक कामकाजाचा आढावा घेऊन नको निवडणूक कामी नियुक्त केलेले सर्व अधिकारी कर्मचारी यांनी निवडणूकीचे कर्तव्य जबाबदारीने करावे तसेच
आचारसंहिता भंगाच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर भरारी पथकाने तातडीने त्यावर कारवाई करावी अशा सक्त सूचना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, उपायुक्त विद्या कदम, पोलीस उप अधीक्षक विक्रांत गायकवाड, मुख्य लेखा वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत भोसले, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर,
सहा आयुक्त सुनील शिंदे आदी उपस्थित होते.
अनुभवी अधिकार्यांची निवडणूक निरीक्षक पदी नेमणूक:
मुख्य निवडणूक निरीक्षक श्री विशाल नरवाडे, (भा.प्र.से.) यांचा निवडणूक प्रक्रियेचा अनुभव:-
श्री. विशाल नरवाडे हे 2020 बॅचचे आय.ए.एस. अधिकारी आहेत. या आगोदर 2016 ते 2020, एकूण चार वर्ष भारतीय पोलीस सेवा (आय.पी.एस.) मधे कार्यरत होते.
त्यांना निवडणूक प्रक्रियेत काम करण्याचा प्रचंड प्रशासकीय अनुभव आहे.
१) कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुका २०१८
२) लोकसभा सार्वत्रिक निवडणुका, २०१९
३) स्थानिक ग्रामपंचायत निवडणुका २०२३
४) लोकसभा सार्वत्रिक निवडणुका, २०२४
५) महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुका, २०२४
तसेच, सहाय्यक निवडणूक निरीक्षक श्री. जीवन गलांडे यांना शांततापूर्ण, मुक्त आणि निष्पक्षपणे निवडणुका घेण्याचा २ दशकांहून अधिक प्रशासकीय अनुभव आहे.
माननीय राज्य निवडणूक आयोगाद्वारे अनुभवी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केल्यामुळे मुक्त आणि निष्पक्ष नगरपालिका निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.
बैठकीत चर्चा करताना निवडणूक निरीक्षक व अधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







