शिवशाहू विकास आघाडी उमेदवारांची बैठक; प्रचार यंत्रणेला गतिमान करण्याच्या सूचना.
इचलकरंजी:
शिवशाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांची एकत्रित बैठक आज काँग्रेस कार्यालयात पार पडली. या बैठकीत उमेदवारांना प्रचार यंत्रणा अधिक गतीमान करण्याबरोबरच आचारसंहिता नियमावलीचे काटेकोर पालन आणि परस्पर समन्वय राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीत सागर चाळके आणि शशांक बावचकर यांनी सर्व उमेदवारांची मते ऐकून घेतली तसेच निवडणूक प्रक्रियेदरम्यान आवश्यक त्या सूचना दिल्या. प्रचाराची दिशा, बूथस्तरावरील संघटन रचना, जनसंपर्क मोहीम यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीत उपस्थित उमेदवारांनी एकसंघ राहून निवडणुकीत प्रभावी कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







