इचलकरंजीत आम आदमी पार्टीच्या प्रचाराला प्रारंभ; महामानवांना वंदन करून मोहिमेला सुरुवात
इचलकरंजी:
आम आदमी पार्टीतर्फे इचलकरंजी शहरात निवडणूक प्रचाराला औपचारिक सुरुवात करण्यात आली. शहरातील महामानवांना वंदन करून प्रचार मोहिमेची सुरुवात करत पक्षाने सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
या प्रसंगी प्रभाग सहा ड येथील उमेदवार यशवंत भंडारे, प्रभाग क्रमांक १४ मधील उमेदवार प्रकाश सुतार, प्रभाग क्रमांक ९ मधील उमेदवार वसंत कोरवी तसेच प्रभाग क्रमांक ७ मधील उमेदवार कांबळे उपस्थित होते. पक्षाचे युवा अध्यक्ष संतोष भागवत आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
प्रचार मोहिमेदरम्यान जनसंपर्क, स्थानिक प्रश्नांवर संवाद आणि स्वच्छ प्रशासनाचा पर्याय मतदारांसमोर मांडण्याचा निर्धार पक्षाकडून व्यक्त करण्यात आला. पक्षकार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत संघटित पद्धतीने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







