मराठी पत्रकार दिन व अंगारकी संकष्टीनिमित्त इचलकरंजी आगारात पत्रकारांच्या हस्ते बसपूजन
इचलकरंजी:
मराठी पत्रकार दिन आणि अंगारकी संकष्टी या दुहेरी योगावर इचलकरंजी आगाराच्या वतीने शिवतीर्थ बस स्थानक येथे एक अनोखा आणि अभिनव उपक्रम राबविण्यात आला. पत्रकार बांधवांच्या वतीने गणपतीपुळे येथे जाणाऱ्या एसटी बसचे विधिवत पूजन करून बस मार्गस्थ करण्यात आली.
या उपक्रमाचे नियोजन इचलकरंजी आगाराचे व्यवस्थापक सागर पाटील यांनी केले. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबासाहेब राजमाने आणि प्रेस क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष अरुण काशीद यांच्या हस्ते पूजनकार्य पार पडले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठीकणे यांनी श्रीफळ वाढवून प्रवाशांना शुभेच्छा दिल्या.
पत्रकार व राज्य परिवहन महामंडळ यांच्यातील आपुलकीचे नाते अधिक दृढ व्हावे, तसेच प्रवाशांना सुरक्षित आणि सुखद प्रवासाचा संदेश द्यावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला घनश्याम कुंभार, धर्मराज जाधव, सुभाष भस्मे, अभिजीत पटवा, दयानंद लिपारे, राजेंद्र पाटील, इराण्णा सिंहासने, सॅम संजापुरे, संतोष काटकर, शैलेंद्र चव्हाण यांच्यासह इचलकरंजीतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये स्थानक प्रमुख सौ. शिल्पा थोरात, कार्यशाळा प्रमुख सुहास चव्हाण, वाहतूक नियंत्रक रमेश नाईक, साहेबराव कोठावळे, पर्यवेक्षकीय कर्मचारी, चालक व वाहक उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बसपुजन करताना पत्रकार बांधव व म.राज्य परिवहन विभागाचे अधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







