क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनदृष्टिकोनाचा विद्यार्थिनींनी अवलंब करावा — प्राचार्या डॉ. त्रिशला कदम
इचलकरंजी:
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनविचार आणि जीवनविषयक दृष्टिकोन प्रत्येक विद्यार्थिनीने आचरणात आणला पाहिजे. त्यांची ज्ञाननिष्ठा आत्मसात करून समाजपरिवर्तनाच्या कार्यात सक्रिय भूमिका बजावली पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्या प्रो. डॉ. त्रिशला कदम यांनी व्यक्त केले.
त्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, समाजवादी प्रबोधिनी, सांस्कृतिक विभाग, महिला सबलीकरण विभाग, अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि आयक्यूएससी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती तथा बालिका दिन संवाद परिषद” या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
यावेळी प्रसाद कुलकर्णी, विभावरी नकाते आणि स्नेहल माळी यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत सावित्रीबाईंच्या कर्तृत्वाचा आणि स्त्रीशिक्षणाच्या वाटचालीचा आढावा मांडला. कार्यक्रमाच्या मंचावर प्रा. वर्षा पोतदार, प्रा. एकता जाधव आणि अक्षय कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयातील दिव्या बिरगणे, स्वानंदी तोरणे आणि नीलम समिंदर यांनी सावित्रीबाईंचा जीवनप्रवास नाट्यरूप सादरीकरणातून प्रभावीपणे मांडला. संविधान परिवार निर्मित “उमज” ही चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली.
कार्यक्रमात एनएसएसमध्ये राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या सानिका युवराज गुरव हिचा सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक प्रा. स्वाती हळवणकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अंकुश कुरणे यांनी मानले. प्रा. प्रतिभा पैलवान यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील अध्यापकवर्ग आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बोलताना प्राचार्य त्रिशला कदम
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







