इचलकरंजी महापालिकेसाठी ओबीसी आरक्षण जाहीर; महापौरपदासाठी रस्सीखेच
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षण जाहीर झाल्याने शहराच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा, शिंदे गट व अजितदादा पवार गटाच्या महायुतीने ४७ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे महापौरपद भाजपाकडे जाणे निश्चित मानले जात आहे.
भाजपा–महायुतीकडून ओबीसी प्रवर्गातून थेट निवडून आलेल्यांमध्ये योगेश पाटील, सतिश मुळीक, प्रदीप धोत्रे, नितेश पोवार, राजू पुजारी, सुशांत कलागते, सौ. किरण खवरे, सौ. प्रमिला जावळे, सौ. रुपा बुगड, सौ. ध्रुवती दळवाई, सौ. विद्या साळुंखे, सौ. रुपाली सातपुते, सौ.सपना भिसे आणि सौ. पुनम माळी यांची नावे महापौरपदासाठी चर्चेत आहेत.
दरम्यान, इतर प्रवर्गातून निवडून आलेले पण ओबीसी जात प्रमाणपत्र असलेले माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, माजी पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे, राजू बोंद्रे, सौ. मोनाली मांजरे, सौ. मनिषा कुपटे यांचीही नावे पुढे येत आहेत.
आरक्षण जाहीर होताच फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला, तर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







