पाणी , वनस्पती आणि जंगल जतन करणे काळाची गरज – मा . डॉ . व्ही एन शिंदे
इचलकरंजी :
पाणी वनस्पती आणि जंगल यांचे जतन करणे हे मानवी जीवनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे . ती काळाची गरज आहे . असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव मा. डॉ . व्ही एन शिंदे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीर उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले . दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज इचलकरंजी या महाविद्यालयाचा मौजे माले येथे सुरू झालेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराप्रसंगी ते बोलत होते .
डॉ . व्ही एन शिंदे पुढे म्हणाले की शुद्ध पंचगंगा मानवाने शुद्ध केली . पाण्याचे महत्त्व आपल्या परिसरातील लोकांना फार उशिरा कळाले . हे सांगत असताना त्यांनी नांदेड येथील एका गावातील श्यामसुंदर या सरपंचाच्या मुलीच्या मृत्यूची घटना सांगितली त्या सरपंचांनी गावचा विकास करण्यासाठी आणि सर्वत्र हिरवाई निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले . त्यांची मुलगी पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेने मृत्यू पावले . या घटनेने ते अस्वस्थ झाले आणि गावात जलसंवर्धन आणि वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प केला . या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न केल्याने गावाचं चेहरा मोहरा बदलला . गाव पाण्याच्या दुष्काळा पासून मुक्त झाले . आजही या गावात एक मुलगी जन्माला आली की १११ झाडे लावली जातात . हा प्रयोग अनेक वर्षांपासून आज तागायत सुरू आहे . यातून गावचा विकास झाला आणि निसर्गाकडे डोळसपणे पाहिल्याने काय परिणाम होतो हे दिसून आले . हे सांगत त्यांनी शिवाजी विद्यापीठाचेही उदाहरण दिले शिवाजी विद्यापीठात कांही वर्षापूर्वी पाण्याची कमतरता होती . राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून जलसंवर्धन करणे हे सुचले आणि त्यातून जलसंवर्धन करण्यासाठी विद्यापीठ परिसरामध्ये तलाव निर्माण करण्यात आले . आज या तलावातून विद्यापीठाला लागणारा सर्व पाणीपुरवठा स्वतंत्रपणे केला जातो . यातून विद्यापीठाचा पाणी प्रश्न मिटल्याचे सांगितले . *तरुणाईचा निर्धार जलयुक्त शिवार* या शीर्षकाने या कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी माले या गावात हा उपक्रम घेतल्याने खूप समाधान वाटले . या पद्धतीने जलसंवर्धनाचे कार्य माले या गावात केले जात आहे . इतर गावांनीही याचा आदर्श घेऊन पाणी , वनस्पती आणि जंगल यांचे संवर्धन केले पाहिजे. जंगलाचे संवर्धन केले तर प्राणी मानवी वस्तीकडे येणार नाहीत . परिणामी निसर्गाचा समतोल साधला जाईल आणि मानवी जीवन अधिक समृद्ध होईल मानवाने समाज माध्यमांपासून जरा जपून राहिले पाहिजे आणि जीवनाचा आनंद घेतला पाहिजे असेही ते म्हणाले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माले या गावचे लोकनियुक्त सरपंच श्री राहुल कुंभार होते . यांनी माले या गावची भूजलपातळी वाढवण्यासाठी आणि पर्जन्यमान वाढ होण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय सेवा योजनेचा कॅम्प घेतल्याचे मत त्यांनी मांडले . भविष्यकाळात माले या गावात पाण्याचे भूजल प्रमाण वाढेल असे मत त्यांनी व्यक्त केले. मागील वर्षाच्या श्रमदानातून २५ % भूजल पातळी वाढल्याचे मत ही त्यांनी व्यक्त केले . कार्यक्रमाचे स्वागताअध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ .) एस के खाडे यांनी *नॉट मी बट यू* असे सांगत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून माले गावच्या भूजल पातळी दिवसेंदिवस वाढत आहे . याबद्दल आम्ही समाधानी आहोत असे मत व्यक्त केले . गावाचा विकास आमच्या सहकार्यातून होत आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे .
दुसऱ्या दिवशी श्रमदान शिबिराचे प्रत्यक्ष कामकाज मा . श्री संजय खुळ (संपादक दैनिक तरुण भारत , इचलकरंजी ) यांच्या शुभहस्ते झाले याप्रसंगी वनरक्षक माले येथील श्री प्रदीप जोशी पाणी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री महेंद्र स्वामी मा . श्री अभिजीत राऊत (सामाजिक कार्यकर्ते ) हे उपस्थित होते . याबरोबरच मालेगावातील पाणी फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी एन एस एस प्रकल्प अधिकारी डॉ . सुनील भोसले डॉ . अजिंक्य पत्रावळे , श्रीमती पूजा पारिशवाड डॉ . सुभाष जाधव आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री संदीप पाटील यांनी केले . तर आभार प्रदर्शन डॉ . अजिंक्य पत्रावळे यांनी मानले . याप्रसंगी गावातील उपसरपंच , गाव पंचायतीचे सन्माननीय पदाधिकारी व सदस्य , प्रतिष्ठित नागरिक आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
मार्गदर्शन करताना व्ही एन शिंदे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







