ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत बेकायदेशीर नशिली इंजेक्शन विक्रीप्रकरणी युवकास अटक; १.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त,स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा


इचलकरंजीत बेकायदेशीर नशिली इंजेक्शन विक्रीप्रकरणी युवकास अटक; १.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त,स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष

इचलकरंजी:
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय नशिली इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करत असलेल्या युवकास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
सदर कारवाई २२ जानेवारी २०२६ रोजी इचलकरंजी शहरातील उत्तम प्रकाश टॉकीज परिसरातील गोविंद अपार्टमेंट, आवाडे नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. आरोपी साहिल किरण पाटील (वय १९, रा. बेघर वसाहत, यड्राव, ता. हातकणंगले) याच्याकडून MEPHENTERMINE SULPHATE इंजेक्शनच्या एकूण ६७ बाटल्या, १,४०० रुपये रोख, सॅमसंग गॅलक्सी मोबाईल व टीव्हीएस ज्युपिटर मोपेड असा एकूण १,१२,३९१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
फिर्याद पोहेकॉ सागर जगन्नाथ चौगले (स्थागुशा, कोल्हापूर) यांनी दिली आहे. तपास प्रभारी पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पोहेकॉ चव्हाण तपास करीत आहेत.

गुन्हे अन्वेषणची कारवाई,स्थानिक पोलिसांचे अपयश

वरील कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या कर्मचाऱ्यांनी केली,कारवाईचे ठिकाण हे मध्यवस्तीत असून वर्दळीचे असतानाही स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती कशी मिळत नाही याबाबत नागरिकांच्यांत उलट सुलट चर्चा सुरू आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा