इचलकरंजी आगारमध्ये ‘चालक दिन’ उत्साहात संपन्न
इचलकरंजी:
इचलकरंजी आगारामध्ये २४ जानेवारी रोजी ‘चालक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने अपघातविरहित सुरक्षित सेवा देत उत्कृष्ट केपीटीएल (किलोमीटर प्रति लिटर) साध्य करणाऱ्या चालकांचा गौरव करण्यात आला. गौरवप्राप्त चालकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
गौरवप्राप्त चालकांमध्ये श्री. सिद्धराम यळसंगी, श्री. विलास हाके, श्री. माधव शिरसाट, श्री. संदीप दावने, श्री. सचिन कोळी, श्री. प्रमोद गायकवाड, श्री. रावसो पुजारी, श्री. पांडुरंग शिंदे, श्री. सुनिल कांबळे, श्री. सिकंदर नंदिकर, श्री. अवधूत बोंगारडे, श्री. अमोल तेवरे व श्री. महेश साळोखे यांचा समावेश आहे.
कार्यक्रमास इचलकरंजी आगारातील अधिकारी श्री. सागर पाटील, श्री. सुहास चव्हाण यांच्यासह पर्यवेक्षक, चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी तसेच प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करत सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतूक सेवेचे महत्त्व अधोरेखित केले. चालकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भविष्यातही अशीच उत्कृष्ट सेवा देण्याचे आवाहन करण्यात आले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









