आपटे वाचन मंदिर मध्ये मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम संपन्न.
इचलकरंजी
शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी आपटे वाचन मंदिराच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त श्री. ना. बा. बाल विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांना निमंत्रित करून त्यांना ग्रंथालयातील सर्व विभाग आणि भरवलेले बाल साहित्य प्रदर्शन दाखविण्यात आले. त्यावेळी ग्रंथालयाचे कार्यवाह प्रा. मोहन पुजारी यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व विषद करून , नियमित ग्रंथालयात येऊन वाचन करून वाचन छंद जोपासावा असे आवाहन केले. यावेळी श्री. ना. बा. बाल विद्यामंदिर मधील शिक्षक श्री. मुकुंद चव्हाण, श्री. संतोष कारंडे आणि ग्रंथपाल श्री. आनंदा काजवे उपस्थित होते.
वाचनाचे महत्व विशद करताना प्रा.मोहन पुजारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







