ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा विद्यार्थ्यांची अर्टिस्ट कॉन्फरन्समध्ये ऐतिहासिक कामगिरीः राष्ट्रीय व्यासपीठावर संस्थेचा डंका

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा विद्यार्थ्यांची अर्टिस्ट कॉन्फरन्समध्ये ऐतिहासिक कामगिरीः राष्ट्रीय व्यासपीठावर संस्थेचा डंका

इचलकरंजी ता २७ः डीकेटीई मधील टेक्स्टाईल डिप्लोमाच्या विद्यार्थीनी मुंबई येथे झालेल्या इंडियन अर्टिस्ट कॉन्फरन्स ब्रिंगींग ट्रॅडिशिनल आर्ट फॉरम्स टू लाईफ या राष्ट्रीय स्तरावरील कला परिषदेत दैदिप्यमान यश संपादन करत संस्थेच्या नावलौकिक देशपातळीवर वाढविला आहे. या यशातून डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, सांस्कृतिक गुणवत्ता अधोरेखित झाली असून संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व कलात्मक परंपरेला नवा गौरव प्राप्त झाला आहे.
सोफिया बी.के. सोमाणी पॉलिटेक्निक, मुंबई येथे आयोजित या परिषदेत देशभरातील नामवंत कलाकार, डिझायनर्स व तज्ञांच्या उपस्थितीत विविध कला व डिझाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. इको डिझाईन पिच, लोकनृत्य, कला की कहानी, चित्रकला व फॅब्रिक पेंटिंग ग्रीन स्टोरीटेलिंग व फॅशन प्रेझेंटेशन अशा स्पर्धामध्ये डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेत आपली कलात्मक उंची सिध्द केली.
लोकनृत्य प्रकारात डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनींनी अत्यंत प्रभावी व सुसंवादी सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावून रु. पंधरा हजार रोख पारितोषिक मिळविले. कला की कहानी स्पर्धेत डीकेटीईच्या ग्रुप १ ने द्वितीय क्रमांक मिळवत रु. दहा हजार तर ग्रुप क्र. २ ने तृतीय क्रमांक पटकावत रु पाच हजार पारितोषिक प्राप्त केले. इको डिझाईन पिच स्पर्धेतही डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी सर्जनशील संकल्पनांच्या जोरावर लक्षवेधी कामगिरी केली.
पारंपारिक भारतीय कलेला आधुनिक अभिव्यक्तीची जोड देत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या प्रतिभेचा ठसा उमटविला. या उल्लेखनीय यशाबददल उपस्थित मान्यवर, शिक्षणतज्ञ व कला क्षेत्रातील तज्ञांनी डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.
डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ.सौ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील, डिप्लोमा विभागप्रमुख प्रा. आर. के. वळसंग, प्रा. पी.एस. कुलकर्णी व प्रा. सौ. एस.एस. सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.

डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा विद्यार्थ्यांनी इंडियन अर्टिस्ट कॉन्फरन्समध्ये विविध बक्षिस प्राप्त केलेबददल सत्कार करीत असताना संस्थेच्या सचिव डॉ सपना आवाडे, डॉ एल.एस.आडमुठे व इतर मान्यवर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा