इचलकरंजीत मृदुला दाढे यांची संगीत कार्यशाळा
इचलकरंजी:
प्रसिद्ध हिंदी चित्रपट संगीत अभ्यासक व त्याच विषयावरील पीएचडी प्राप्त विशेषज्ञ आणि लेखिका व प्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे, मुंबई यांची एक दिवसीय ‘संगीत कार्यशाळा’ इचलकरंजीत रविवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल, अ. भा. मराठी नाट्य परिषद इचलकरंजी शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इचलकरंजी यांच्या वतीने सदरची कार्यशाळा रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र, नाकोडा नगर, इचलकरंजी येथे होणार आहे.
या कार्यशाळेमध्ये सुगम संगीत म्हणजे काय, शास्त्रीय संगीत शिकण्याचे फायदे, चित्रपट गीतांचे सौंदर्य, आवाजाचे नियंत्रण कसे करावे, कराओके गाणं म्हणताना घेण्याची काळजी, भाव प्रकटीकरणात तालाची व आवाजाची भूमिका, माईकवर प्रभावी गाण्याचे तंत्र, इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सुगम गायनात करिअर करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी, अचूक गायनाचे मर्म जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या हौशी आणि व्यावसायिक गायकांसाठी त्याचबरोबर गाणे कसे ऐकावे हे शिकण्याची इच्छा असणाऱ्या रसिकांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त अशी आहे. कार्यशाळेत मर्यादित सदस्यांना प्रवेश असून नाव नोंदणी, प्रवेश फी आणि अधिक माहितीसाठी इच्छुकांनी मनोरंजन मंडळ, दाते मळा, इचलकरंजी येथे संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







