ICHMH51NEWS.IN
9921600800

एमडी शुटमुळे वाढलेल्या वीज बिलांबाबत उद्योजकांसाठी २ फेब्रुवारी रोजी बैठक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

एमडी शुटमुळे वाढलेल्या वीज बिलांबाबत उद्योजकांसाठी २ फेब्रुवारी रोजी बैठक

इचलकरंजी:
जुलै २०२५ पासून इचलकरंजी व परिसरातील २७ एच.पी. (२० किलोवॅट) खालील यंत्रमाग उद्योजक, इंजिनिअरिंग उद्योजक तसेच इतर लघुउद्योगधारकांच्या वीज बिलांमध्ये अचानक वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. महावितरणकडून एमडी (Maximum Demand) शुट झाल्याने संबंधित उद्योजकांची वीज बिले केडब्ल्यूएच (kWh) ऐवजी केव्हीएएच (kVAh) प्रमाणे आकारली गेल्यामुळे ही वाढ झाली आहे.
या पार्श्वभूमीवर महावितरणचे मा. मुख्य अभियंता यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. त्यामध्ये एमडी शुटमुळे ज्यांची वीज बिले वाढली आहेत, अशा उद्योजकांना सविस्तर माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार, वीज बिलांतील वाढीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी सोमवार, दि. ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता ‘दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन’ येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. संबंधित सर्व उद्योजकांनी या बैठकीला वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा