अल्पसंख्याकांसाठी ३४०० कोटींची तरतूद,मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय : आकाशा मुल्ला
इचलकरंजी –
देशाच्या इतिहासात आजपर्यंत कधीच झाली नाही एवढी तरतूद अल्पसंख्यांक मंत्रालयासाठी करण्यात आली आहे. तब्बल ३४०० कोटींची तरतूद करत मोदी सरकारने देशातील तमाम मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्यांक समाजाच्या आर्थिक उन्नतीचे उद्दिष्ट समोर ठेवले. मोदी सरकारचा हा निर्णय मुस्लिम समाजाला विकासाच्या प्रवाहात आणून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणारा असल्याचे भाजपचे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष आकाशा मुल्ला यांनी सांगितले.
देशात आतापर्यंत कोणत्याच सरकारला जमले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार राहूल आवाडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात विकासाच्या प्रवाहात येऊ लागला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अल्पसंख्याक कार्य मंत्रालयासाठी ३४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम मागील आर्थिक वर्षातील ३ हजार ३९५ कोटींच्या तुलनेत ४.३८ कोटींनी अधिक आहे. अल्पसंख्याक मंत्रालयाची तरतूद 2026-27 साठी तरतुद 3 हजार 400 कोटी 2025-26 मध्ये 3 हजार 395 कोटी इतकी करण्यात आली होती. मुख्य योजना कार्यक्रमासाठी १ हजार १९७ कोटी रुपयांची तरतूद असेल या निधीतून शिक्षण, आरोग्य, निवास सामूदायिक पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे. प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम अंतर्गत शाळा, वसतिगृहे, आरोग्य केंद्रे आणि सामुदायिक इमारतींचा विकास आणि दुर्बल व मागास घटकांना थेट लाभ मिळेल. तर महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेतून नेतृत्व क्षमता विकास, आर्थिक साक्षरता आणि आत्मविश्वास वाढीसाठी प्रशिक्षण अशा विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ मुस्लिम समाजातील महिलांनाही मोठ्या प्रमाणात मिळणार असून महिलांचे आत्मनिर्भरते कडे वाटचाल होणार असेही आकाशा मुल्ला यांनी सांगितले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







