डीकेटीईच्या‘शक्तीपर्व २०२६‘ स्नेहसंमेलनास शिवजन्मोत्सवाने मोठया दिमाखात सुरवात
इचलकरंजी:
डीकेटीई संस्थेचे वार्षिक स्नेहसंम्मेलन हे इचलकरंजीकरांच्या कुतुहलाचा व आकर्षणाचा विषय असतो. दरवर्षी विविध विषयातून डीकेटीईचे विद्यार्थी भारतीय संस्कृती आणि परंपरेचे दर्शन राजवाडयामध्ये घडवितात. या वर्षी ‘शक्तीपर्व २०२६‘ स्नेहसंमेलनाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ढोलपथकाने मानंवदना देवून मोठया दिमाखात साजरी करण्यात आली. पारंपारिक वाद्यांच्या निनादात लेझिम, हलगी, धनगर ढोल तसेच मर्दानी क्रिडांचे थरारक प्रात्यक्षिकांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला.
डीकेटीई मध्ये दिनांक १९ व २० फेब्रुवारी २०२६ दरम्यान डान्स शो, व्हरायटी शो, रक्तदान, जिनीअस, फोटोग्राफी, फिशपाँड अशा भव्य कार्यक्रमांबरोबरच विविध स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित केले आहेत. यावेळी शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात सुमारे १५० हून अधिक विद्यार्थी व स्टाफ यांनी उत्स्फुर्त सहभचक्ष नोंदवत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
डीकेटीईचा ट्रॅडीशनल डे अर्थात पारंपरिक पोषाख दिन हा वेगवेगळया कलाकृतीतून संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात भव्य अशा मिरवणुकीने आणलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार घालून ढोलपथकाने मानवंदना देवून करण्यात आली. यावेळी विविध वेशभुषेमध्ये जसे की, छ. शिवाजी महाराज, मावळे, साधू, संत, दाक्षिणात्य वेषभूषा इ. विविध वेषभूषांचे विद्यार्थ्यांच्या मार्फत सादरीकरण करण्यात आले. दरवर्षी विविध विषयातून डीकेटीईचे विद्यार्थी भारतीय संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवितात आणि कौतुकाची थाप मिळवितात.
सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे, आमदार डॉ राहुल आवाडे, एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर रवी आवाडे व सर्व ट्रस्टी यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी डायरेक्टर प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, डे.डायरेक्टर डॉ. यु.जे.पाटील, सोशल डीन प्रा.एस.जी कानिटकर प्रा.ए.व्ही.शहा, डॉ. ए.आर.बलवान, प्रा.ए.यु.अवसरे, विघार्थीप्रतिनिधी यांचेसह सर्व डीन्स, विभागप्रमुख, स्टाफ, विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

स्नेहसमेलनात पारंपारिक दिनानिमित्त शिवजन्मोत्सव कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे, राहुल आवाडे, एल.एस.आडमुठे व विद्यार्थी

डीकेटीईच्या स्नेहसमेलनात पारंपारिक दिनानिमित्त छ. शिवाजी महाराज यांच्या वेशात डीकेटीईचे विद्यार्थी
फोटो ओळी क्र. ३ ते ५ डीकेटीईच्या स्नेहसमेलनात पारंपारिक दिनानिमित्त आपली कला सादर करीत असताना विद्यार्थी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800