ICHMH51NEWS.IN
9921600800

इमनपा स्वीकृत नगरसेवक निवडी जाहीर,भाजपचे ४ तर शिवशाहूचे २ नगरसेवक प्रेक्षक गॅलरीत गोंधळ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इमनपा स्वीकृत नगरसेवक निवडी जाहीर,भाजपचे ४ तर शिवशाहूचे २ नगरसेवक,प्रेक्षक गॅलरीत गोंधळ

इचलकरंजी:

 इचलकरंजी महानगरपालिकाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्य व विविध विषय समिती सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. महापौर उदय धातुंडे यांनी स्वीकृत सदस्यांसह समिती रचनेची अधिकृत घोषणा केली.

भाजपच्या वतीने प्रकाश दत्तवाडे, अविनाश कांबळे, मारुती पाथरवट आणि इम्रान बागवान यांची स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. तर शिव शाहू विकास आघाडीकडून संजय कांबळे आणि इम्रान हावेरी यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली.

स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू होताच विरोधी गटनेते उदयसिंग पाटील यांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विरोधकांना तीन दिवसांपूर्वी अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले होते, तर सत्ताधाऱ्यांचे अर्ज त्याच दिवशी का स्वीकारले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावर भाजपचे सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांनी महापालिका अधिनियमाच्या तरतुदीनुसारच अर्ज दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

यानंतर संख्याबळाच्या आधारे विविध विषय समित्यांवरील सदस्यांची घोषणा करण्यात आली. १६ सदस्यीय स्थायी, शिक्षण व महिला बालकल्याण समितीत सत्ताधारी भाजपचे ११ सदस्य, शिवसेना शिंदे गटाचा १ सदस्य आणि विरोधी शिव शाहू विकास आघाडीचे ४ सदस्यांचा समावेश करण्यात आला. १२ सदस्यीय परिवहन समितीत भाजपचे ८, शिवसेना शिंदे गटाचा १ आणि शिव शाहू विकास आघाडीचे ३ सदस्यांचा समावेश आहे.

महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी चार प्रभाग समित्यांच्या निवडीची प्रक्रिया, सदस्यांचा कालावधी आणि कार्यपद्धती याबाबत माहिती दिली. प्रभाग समित्यांमधील विषयांना महासभेची मंजुरी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापौर धातुंडे यांनी चारही प्रभाग समित्यांची घोषणा लवकरच करण्यात येईल, असे सांगितले.यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या,आयुक्त पल्लवी पाटील,नगरसचिव राहुल पोटे उपस्थित होते.

प्रेक्षक गॅलरीत गोंधळ

प्रेक्षक गॅलरीत पत्रकारांना बसण्यासाठी परवानगी देण्यात आली होती,त्यामध्ये स्वीकृत नगरसेवकांचे समर्थक उपस्थित राहिल्याने आवाज वाढत होता,त्याच बरोबर ध्वनिक्षेपक व्यवस्था व्यवस्थित नसल्याने सभेचे कामकाज समजुन घेण्यात पत्रकाराणा अडचणींचा सामना करावा लागल्याने गोंधळाची स्थिती वारंवार निर्माण होत होती.त्यामुळे पत्रकारांना स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी प्रशासन व गटनेते विठ्ठल चोपडे यांच्याकडे पत्रकारांनी केली.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा