जेईई मेन्स 2026 परीक्षेत श्रद्धा इन्स्टिट्यूट पश्चिम महाराष्ट्रात अव्वल,उत्कृष्टतेचे एक नवे पर्व
इचलकरंजी :
National Testing Agency (NTA) द्वारे घेण्यात आलेल्या आणि अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या JEE Main 2026 (सेशन–1) चा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालात इचलकरंजी येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट ने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
संस्थेचा विद्यार्थी प्रणव बागरेचा याने तब्बल 99.97 पर्सेंटाइल मिळवत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत संस्थेचे वर्चस्व अधोरेखित केले. त्याचबरोबर कु. पाटील सोहम (99.90), कोरे प्रणव (99.77), म्हेत्रे मनस्वी (99.76), सस्ते पियुष (99.75), आशिष जहांगीरदार (99.72), तोतला श्रेष्ठ (99.69), नवले अनुज (99.53), नलावडे सायली (99.45), पाटील समृद्धी (99.37), धैर्य चौधरी (99.36), दाते अभेद्य (99.29), कापडी अथर्व (99.27), साखरे पृथ्वीराज (99.24), खोत मानसी (99.23), कदम नीलभ (99.8), तोतला मयंक (99.7), कदम अजिंक्य (99.7), अडसुळे हर्षल (99.3) यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी 99 पर्सेंटाइलपेक्षा जास्त गुण मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले.
याशिवाय केसवानी प्रांजल (98.96), पाटील ईश्वरी (98.96), घाटुळे संकेत (98.91), गंगारडे श्रेया (98.85), पाटील अनन्या (98.84), गडदे अथर्व (98.79), भुइंगडे सोमनाथ (98.77), शिंदे प्रणव (98.73), काबरा जान्हवी (98.65), कदम सुशांत (98.63), लाड योगेश्वरी (98.61), शिंदे अनिकेत (98.56), तेलसिंगे पूर्वा (98.54), गडदे वेदांत (98.54), चव्हाण आर्या (98.54), दानवाडे मुशरत (98.52), पाटील सौमित्र (98.47), कोळके रजत (98.35), रेपे अथर्व (98.31), पाटील विरेन (98.26), कुंभार विवेक (98.18), पवार वेदांत (98.16), कबाडे आदित्य (98.13), ढेंबरे मयुरेश (98.10), पाटील आदित्य (98.10), बाहेती रोनक (98.10) यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.
या निकालात 99 पर्सेंटाइलहून अधिक गुण मिळवणारे 19 विद्यार्थी तर 90 पर्सेंटाइलहून अधिक गुण मिळवणारे तब्बल 158 विद्यार्थी आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व निकाल एका शाखेतून लागल्याने संस्थेची सातत्यपूर्ण गुणवत्ता आणि शैक्षणिक बांधिलकी अधोरेखित होते.
संस्थेचे अध्यक्ष श्री. ए. आर. तांबे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “यशाची उंची गाठण्यासाठी योग्य नियोजन, सातत्यपूर्ण सराव आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन अत्यावश्यक असते. विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम आणि शिक्षकांचे अचूक मार्गदर्शन यामुळेच असे असामान्य निकाल शक्य झाले.”
या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री. ए. आर. तांबे, समन्वयक एम. एस. पाटील, सौ. संगीता पवार, सौ. सुप्रिया कौंदाडे, श्री. अभिषेक तांबे व सौ. सृष्टी तांबे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
अचूक नियोजन, परीक्षाभिमुख अभ्यासपद्धती, प्रभावी टेस्ट सिरीज आणि पालकांचा दृढ विश्वास या चार आधारस्तंभांवर उभे राहून श्रद्धा इन्स्टिट्यूट दरवर्षी उत्कृष्टतेचा नवा अध्याय रचत आहे. यंदाचा निकाल हा केवळ यश नाही, तर उत्कृष्टतेच्या नव्या पर्वाची नोंद आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




