ICHMH51NEWS.IN
9921600800

आपटे वाचन मंदिरास शासनाचा मराठी भाषा पुरस्कार.     

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आपटे वाचन मंदिरास शासनाचा मराठी भाषा पुरस्कार.     

 इचलकरंजी:
 येथील शतकोत्तर सुवर्ण असे आपटे वाचन मंदिराची महाराष्ट्र शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२५ (संस्था) या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. डॉ. अशोक केळकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषा अभ्यासक, साहित्य आणि संस्कृतीचे जाणकार संशोधक व समीक्ष होते.  मराठी भाषा अभ्यासाची  परंपरा समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील व्यक्तीस, संस्थेत महाराष्ट्र शासनातर्फे प्रतिवर्षी डॉ .अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. सन २०२५ या वर्षातील संस्था पुरस्कारासाठी शासनाने आपटे वाचन मंदिराची निवड केली आहे. रुपये दोन लक्ष, सन्मान चिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याबाबतची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात केली.                                     दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित विश्व मराठी साहित्य संमेलनात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. आपटे वाचन मंदिरास जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल ग्रंथालयाच्या अध्यक्ष सौ. सुषमा दातार यांनी शासनाविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. दीड शतकांचा समृद्ध वारसा असणाऱ्या या ग्रंथालयाने वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याचे काम केले आहे. तसेच वाचकांची अभिरुची घडविण्याचे काम केले आहे. हा पुरस्कार उमेद आणि पाठबळ देणारा असल्याचे सौ. सुषमा दातार यांनी सांगितले. ग्रंथालयाच्या आजपर्यंतच्या वाटचालीत योगदान देणारे सर्व पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते, वाचक, श्रोते, कर्मचारी या सर्वांच्या योगदानातून ग्रंथालय कार्यरत राहिले असून या पुरस्कारामुळे ग्रंथालयाची जबाबदारी आणखी वाढली असल्याची जाणीव होत आहे व त्या दृष्टीने आम्ही कार्यरत राहू असेही सौ. सुषमा दातार यांनी सांगितले.
याप्रसंगी कार्यवाह प्रा. मोहन पुजारी, सहकार्यवाह प्रा . सुजित सौंदत्तीकर, ॲड. स्वानंद कुलकर्णी, माया कुलकर्णी, मीनाक्षी तंगडी, संजय सातपुते, राजेंद्र घोडके, बाळासाहेब कलागते, श्रीकांत चंगेडिया व माजी कार्यवाह जयप्रकाश शाळगावकर हे उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा