ICHMH51NEWS.IN
9921600800

रेल्वे कृती समितीचे सोमवारी प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रेल्वे कृती समितीचे सोमवारी प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन

इचलकरंजी-
नियोजित हातकणंगले इचलकरंजी रेल्वे मार्गाला गती मिळावी या मागणीसाठी सोमवारी २३ फेब्रुवारी रोजी प्रांत कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन हाती घेण्यात आले असल्याने या आंदोलनात इचलकरंजीतील सर्व नागरिक उद्योजक व रेल्वे प्रेमी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन इचलकरंजी रेल्वे कृती समितीच्या वतीने करण्यात आले  आहे.
   इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे मोठे केंद्र आहे देशातील प्रत्येक नागरिक या शहराशी जोडला आहे येथील सुत व कापडाची मोठ्या प्रमाणात आवकजावक होते ही गरज ओळखून इचलकरंजी रेल्वे कृती समितीने २०१२ पासून इचलकरंजी रेल्वे यावी यासाठी पुढाकार घेत वेळोवेळी पाठपुरावा केला‌. येथील उद्योजकानी ही या मागणीला पाठिंबा दिला. एवढेच नव्हे तरी शाळेतील विद्यार्थ्यांनीही जवळपास १५००० पत्रे पंतप्रधान कार्यालय, रेल्वे मंत्रालय यांना पाठवली. या सर्वांची मागणी लक्षात घेता २०१७ साली तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या नियोजित आठ किलोमीटर रेल्वे मार्गाला मंजुरी दिली. सर्वेक्षण झाले हा प्रकल्प मंजूर झाला.
 केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या बजेटमध्ये वेळोवेळी वाढ करून हेड जिवंत ठेवण्याचे काम केले. यामुळे इचलकरंजीकरांच्या रेल्वे विषयीच्या अपेक्षा वाढल्या पण हा रेल्वे प्रकल्प पैसाअभावी अडकला. राज्य सरकार निमा हिसा व केंद्र सरकारचा निम्मा असे धोरण असल्याने सरकार पातळीवर खासदार, आमदार यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत. यामुळे हा प्रकल्प रेंगाळत पडला आहे. वेळोवेळी खासदार, आमदारांना जाणीव करून
देऊन ही त्यानी दुर्लक्ष केल्याने रेल्वे कृती समिती आता इचलकरंजीच्या जनतेच्या दरबारात जाणार असून याचाच भाग म्हणून गेल्या आठवड्यात ्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले, इचलकरंजी रेल्वेची लोक चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी व लोकांचा सहभाग घेण्यासाठी सोमवारी प्रांत कार्यालयासमोर सकाळी १० ते सायंकाळी ५ , या वेळेत एक दिवसाचे धरणे आंदोलन हाती घेत आहे. तरी आंदोलनात सर्व जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होऊन इचलकरंजी रेल्वेचा प्रवास जलद करण्यासाठी पाठिंबा द्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा