इचलकरंजीत 28 फेब्रुवारीला महाआरोग्य शिबिराचे आयोजन
इचलकरंजी :
रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब, इचलकरंजी व ग्रामीण रुग्णालय हातकणंगले यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रोटरी भवन, दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र, नाकोडा नगर, निरामय हॉस्पिटल शेजारी, इचलकरंजी येथे सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत पार पडणार आहे.
या शिबिरामध्ये साधारणतः 1500 ते 2000 रुपये खर्च येणाऱ्या विविध रक्त तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. यामध्ये सीबीसी (CBC), एलएफटी (LFT), केएफटी (KFT), सिरम कॅल्शियम, सिरम इलेक्ट्रोलाइट्स, एचबीए1सी (HB A1C), व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D3, थायरॉईड टेस्ट, लिपिड प्रोफाइल, आरए फॅक्टर, टायफॉईड टेस्ट, कोअॅग्युलेशन टेस्ट तसेच युरीन तपासणी यांचा समावेश आहे.
याचबरोबर डोळ्यांची तपासणी करून नंबर तपासणे व मोतीबिंदू तपासणीही मोफत करण्यात येणार आहे. नागरिकांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







