ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत आज पाणीपुरवठा बंद; नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत आज पाणीपुरवठा बंद; नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन

इचलकरंजी :
शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत उपकरणांची तातडीची दुरुस्ती तसेच मुख्य स्विच यार्डमधील विविध कामे हाती घेण्यात आल्यामुळे मंगळवार (१७ मार्च) रोजी शहराचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत उपकरणांची दुरुस्ती, मजरेवाडी येथील जॅकवेलजवळ जुन्या पाइपवरील गळती दुरुस्ती तसेच पंचगंगा परिसरातील पाइपलाईनवर व्हॉल्व बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामांसाठी शुद्ध जल उपसा केंद्र बंद ठेवावे लागणार असल्याने शहराचा पाणीपुरवठा सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत बंद राहणार आहे.
दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पाणी उपसा बंद असल्यामुळे काही भागांत पाणीपुरवठा विस्कळीत होऊन नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. याबाबत महानगरपालिका प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी शहरवासीयांनी उपलब्ध पाण्याचा साठा जपून वापरावा, असे आवाहन केले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा