ईद निमित्त ‘आधार गौरव’ पुरस्कार व खीर साहित्य वाटप
इचलकरंजी:
आपल्या धर्माचा अभिमान बाळगताना इतर धर्मांचाही सन्मान कसा करावा याचे आदर्श उदाहरण इचलकरंजीतील मुस्लिम समाजातील ‘आधार’ संस्थेने संपूर्ण राज्यासमोर ठेवले आहे. समाजातील एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी अशा उपक्रमांची आज नितांत गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांनी केले.
येथील आधार बहुउद्देशीय सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संस्थेच्या वतीने ‘आधार गौरव’ पुरस्कार प्रदान समारंभ तसेच आधार बैतुलमाल कमिटीच्या वतीने गरजू नागरिकांना ईदनिमित्त खीर मसाला साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हाळवणकर बोलत होते.
ते पुढे म्हणाले, सर्वजण सण साजरा करत असताना गोरगरीबांच्या घरातही ईद साजरी व्हावी या हेतूने आधार परिवाराने खीर साहित्य देऊन त्यांना खऱ्या अर्थाने आधार दिला आहे. अशा उपक्रमांतून समाजात बंधुभाव आणि एकतेची भावना अधिक बळकट होते.
कृष्णानगर येथील आधार लायब्ररीत झालेल्या कार्यक्रमात यंदा डॉ. जावेद मुन्वर बागवान (वैद्यकीय), अॅड. रियाज बाबालाल मुल्ला (न्याय), जाफर रसुल मुजावर व इम्रान अब्दुलरहमान शेख (सामाजिक), शफिक शमशुद्दीन मुल्लाणी, रफीक गुलाब मुल्ला, सौ. नाजिया एजाज नवाब (शैक्षणिक) व राजू अकबर काझी (उद्योग) यांना ‘आधार गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सौ. शहनाज अरिफ मोमीन यांना ‘उत्कृष्ट संचालक’ तर सामाजिक कार्याबद्दल बाबुमियाँ सिकंदर ढालाईत यांना ‘आधार विशेष’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत आधार लायब्ररीचे अध्यक्ष मेहबुब मुजावर यांनी केले. प्रास्ताविकात आधार संस्थेचे अध्यक्ष तौफिक मुजावर यांनी संस्थेच्या आजवरच्या कार्याचा आणि विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
यावेळी मन्सुर मुजावर, बैतुलमाल कमिटीचे अध्यक्ष लतिफ गैबान, नगरसेवक इम्रान बागवान, कु. यास्मीन तासगांवे,इम्रान हावेरी, गडहिंग्लजच्या नगरसेविका सौ. शबनम सय्यद, ईद फेस्टिवलचे उपाध्यक्ष नुरमहंमद बागवान, संस्था उपाध्यक्ष हारुण पानारी, महिला मंडळ अध्यक्षा सौ. साजिदा मुजावर, माजी नगरसेविका सौ. बिलकिस मुजावर, सौ. ताहिरा गैबान, सौ. रेश्मा शिरगांवे, युसूफ तासगांवे, फारुक आत्तार, सलीम ढालाईत, जकीअहमद मुजावर, फरहान मुजावर, रिफत मगदूम, फैय्याज पानारी, इम्रान तासगांवे, रसुल सय्यद, मौलाना अब्दुलरज्जाक सावनुर, बाळासाहेब मुजावर, बद्रेआलम देसाई, नुरमहंमद मुजावर, झाकीर मुजावर, मेहबुब सनदी, वाजिद तासगांवे, राबिया मुजावर, आसमा लाटकर व ग्रंथपाल रिजवाना गैबान आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रफिक मुल्ला यांनी केले, तर आभार फरीद मुजावर यांनी मानले.
आधार गौरव पुरस्कार वितरण करताना माजी आमदार सुरेशराव हाळवणकर व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







