इचलकरंजीहून अक्कलकोट दर्शनासाठी एसटीच्या जादा बसेस
इचलकरंजी :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) इचलकरंजी आगाराच्या वतीने खास श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भक्तांसाठी अक्कलकोट दर्शनाची विशेष सोय करण्यात आली आहे. शुक्रवार, दिनांक 20 मार्च 2026 रोजी इचलकरंजी आगारातून अक्कलकोटसाठी जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी दिली आहे.
या विशेष सेवेत दोन बसेस उपलब्ध असणार आहेत. पहिली बस इचलकरंजी बस स्थानकातून सकाळी 5.30 वाजता सुटून दुपारी 3.00 वाजता परत येणार आहे. तर दुसरी बस सकाळी 9.00 वाजता सुटून सायंकाळी 6.00 वाजता परत येणार आहे.
या प्रवासासाठी महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक तसेच ‘अमृत’ योजनेअंतर्गत सवलती लागू राहणार असून, समूह (ग्रुप) बुकिंगसाठीही सवलतीच्या दरात बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 9823288535, 9970632135, 9767908172, 8421604041, 8975893036, 8208698288 या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







