ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत रमजान ईद उत्साहात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत रमजान ईद उत्साहात

इचलकरंजी:
इचलकरंजी व परिसरातील मुस्लिम बांधवांनी शनिवारी पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. स्टेशन रोडवरील ईदगाह मैदान येथे सकाळी सामुहिक नमाज पठण करण्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव जमले होते. यावेळी जागतिक शांततेसह देशातील एकता व अखंडता तसेच जातीय सलोखा कायम राहून सर्व संकटे दूर होण्यासाठी दुवापठण करण्यात आले. नमाजनंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रशासनाच्या वतीने  अप्पर पोलीस अधिक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
मुस्लिम समाजात रमजान ईद सर्वात मोठा सण मानला जातो. यादिवशी ईदगाह मैदान येथे सामुहिक नमाज पठण केले जाते. मोठ्या संख्येने ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी जमले होते. बयान जामे मस्जिद इमाम मौलाना आशिकईलाहि रफिक शेख यांनी तर  नमाज पठण  हजरत सय्यद मगदुम वली दर्गा इमाम हाफीज महमद जाकिरहुसेन शेख यांनी केले.

हजरत सय्यद मखतूमवली दर्गा ट्रस्ट व इदगाह ट्रस्ट यांचे वतीने नियोजन करण्यात आले होते. बादशाह बागवान व अहमद मुजावर यांनी आभार मानले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली होती. नमाज संपल्यानंतर एकमेकांना शुभेच्छा देत सेल्फी घेण्यामध्ये युवा पिढी रमल्याचे दिसून आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांच्या वतीने पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने इदगाह मैदान इचलकरंजी येथे नमाज पठणासाठी जमणाऱ्या मुस्लिम बांधवांना ईद निमित्त गुलाब पुष्प व शरबत देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा