थकबाकीदारांवर महापालिकेची कारवाई तीव्र; १४ मिळकती सील
इचलकरंजी :
महापालिकेच्या थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने कारवाईला वेग दिला असून १४ थकबाकीदार मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. सुमारे १४ लाख रुपयांच्या थकबाकीसाठी संबंधित मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.
मार्च अखेरस केवळ एक आठवड्याचा अवधी शिल्लक असल्यामुळे उर्वरित थकबाकीदारांवर आणखी कडक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जप्तीची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी चार स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली असून शहरातील थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
दरम्यान, दिनांक २२ मार्च २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार घरफाळा वसुलीत ७० कोटींच्या मागणीपैकी ४५ कोटींची वसुली करण्यात आली आहे. तर पाणीपट्टीत ३० कोटींच्या मागणीपैकी केवळ ६ कोटींचीच वसुली झाली आहे. त्यामुळे उर्वरित थकबाकी वसुलीसाठी पुढील काही दिवसांत जप्तीची कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









