‘आपले ज्ञानमंदिर’तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात
इचलकरंजी :
आपले ज्ञानमंदिर बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवार, दि. २२ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदा कौंदाडे सर होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश दूंडाप्पा हातरोटे उपस्थित होते.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व व्यक्तींचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये निलेश पाटणकर (मुंबई हायकोर्ट – मॅरेज कौन्सलर, वर्ग अ अधिकारी), आस्मा मुजावर (केंद्रप्रमुख – शिक्षण), रोहन मोरे (सहाय्यक कक्ष अधिकारी, मंत्रालय), निवास राठोड व अक्षय सोनवणे (लोको पायलट, भारतीय रेल्वे), ओंकार बन्ने (तांत्रिक निरीक्षक, येरवडा कारागृह, पुणे) तसेच शैलेश कांबळे (आदर्श शिक्षक व व्यवस्थापक) यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सजाकली जमादार यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरज तराळ यांनी मानले. यावेळी संस्थेचे सचिव प्रदीप पाटील, सदस्य शैलेश कांबळे, अभिजित बडवे, सोमनाथ आदर्शे आदी उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराप्रसंगी घेतलेले छायाचित्र.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







