कर्तव्यदक्ष अधिकारी तर शंभूतीर्थ कामातील अंतिम टप्प्याच्या कार्यादेशास ७१ दिवसाचा विलंब का?
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेत सध्या एका अधिकाऱ्यांची कर्तव्यदक्षता व कडक शिस्तीची स्तुतीसुमने उधळली जात आहेत,प्रत्यक्षात गावातील जमिनीवरील परिस्थिती आणि अधिकाऱ्यांचा होणारा गवगवा यामध्ये कमालीची तफावत असून त्याबाबत एकेक कारनामे बाहेर येत आहेत.
इचलकरंजी शहरात शंभूतीर्थ लोकार्पण सोहळा पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यावर पार पडला,त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील २ कार्यादेश देण्यात येणार होते,दुसऱ्या टप्प्यातील दुसरा कार्यादेश कार्यतत्पर प्रशासनाने १२-१२-२०२५ रोजी प्रत्यक्षात तयार करून सुद्धा मक्तेदारास २३-२-२०२६ रोजी दिला गेला,पत्रकार परिषदेत आयुक्तांनी वेळेत कार्यादेश दिल्याचे त्यावेळी सांगितले होते. मात्र शंभूतीर्थ सारख्या कामाचा कार्यादेश ७१ दिवसांनी का देण्यात आला,या विलंबामागचे नेमके कारण काय असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







