ICHMH51NEWS.IN
9921600800

जयसिंगराव पवार सरांचे लेखन व संपादन हा मराठी इतिहासातील अनमोल ठेवा-प्रसाद कुलकर्णी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जयसिंगराव पवार सरांचे लेखन व संपादन हा मराठी इतिहासातील अनमोल ठेवा-प्रसाद कुलकर्णी

जयसिंगराव पवार हे मराठीतले अतिशय नामवंत इतिहास संशोधक होते. छत्रपती शिवरायांपासून राजर्षी शाहू महाराज या मोठ्या कालपटाचा इतिहास वर्तमानाशी निगडित करून त्याची अतिशय पुरोगामी पद्धतीने मांडणी सरांनी केली. बहुजनांच्या इतिहासाची तौलनिक मांडणी त्यांनी केली. इतिहासातून आपण कोणता बोध घ्यायचा हे सूत्रबद्ध पद्धतीने सांगणे

हे त्यांचे फार मोठे योगदान आहे. पवार सरांचे लेखन आणि संपादन हा मराठी इतिहासातील वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अनमोल ठेवा आहे.सरांचा आणि माझा अनेक वर्षाचा स्नेह होता. भाई माधवराव बागल विद्यापीठाचा भाई माधवराव बागल पुरस्कार मला त्यांच्या हस्ते काही वर्षांपूर्वी मिळाला होता. त्यावेळी त्यांनी माझ्या कामाबाबत जे जाहीरपणाने कौतुक केले होते तो माझ्यासाठी अनमोल स्फूर्तीदायी ठेवा आहे. एक फार मोठा प्रज्ञावंत इतिहासकार आपण गमावला आहे.समाजवादी प्रबोधिनी परिवाराची भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रसाद माधव कुलकर्णी , समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा