ICHMH51NEWS.IN
9921600800

कर्तव्यदक्ष प्रशासनाचा निष्काळजीपणा  अर्ज प्रलंबित असताना झाडाची फांदी कोसळली; सुदैवाने जिवितहानी टळली

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कर्तव्यदक्ष प्रशासनाचा निष्काळजीपणा 

अर्ज प्रलंबित असताना झाडाची फांदी कोसळली; सुदैवाने जिवितहानी टळली

इचलकरंजी :
शहरातील वॉर्ड क्र. १०, मिळकत क्र. e-29 येथे झाडांच्या धोकादायक फांद्यांबाबत वेळेत कारवाई न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अर्जदार आनंद सुधाकर दौडे यांनी इचलकरंजी महानगरपालिकेकडे ११ फेब्रुवारी २०२६ रोजी धोकादायक फांद्या छाटणीसाठी अधिकृत अर्ज सादर केला होता. मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
अर्जात नमूद केल्याप्रमाणे संबंधित ठिकाणी दोन झाडांच्या फांद्या अत्यंत वाढून अस्ताव्यस्त झालेल्या असून त्या थेट मिळकतीमध्ये शिरल्या होत्या. काही फांद्या पूर्णपणे सुकलेल्या असल्याने रस्त्यावर पडण्याचा धोका निर्माण झाला होता. हा रस्ता रहदारीचा असल्याने अपघात होण्याची शक्यता अर्जदाराने स्पष्टपणे मांडली होती.
तरीदेखील, उद्यान विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आज पावसादरम्यान झाडाची एक मोठी फांदी अचानक कोसळली. सुदैवाने त्या वेळी परिसरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली, मात्र संभाव्य मोठा अपघात टळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अर्जदाराने उद्यान पर्यवेक्षकांना भेटून पाठपुरावा केल्याचे सांगितले असून, तरीही प्रशासनाने दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या घटनेमुळे महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा निष्काळजीपणामुळे भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन धोकादायक झाडांवर आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रस्त्यावर पडलेली झाडाची फांदी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा