ICHMH51NEWS.IN
9921600800

एमपीएससी परीक्षेत श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्विसेसच्या विजयी घोडदौडीला सुरुवात..  (पहिल्याच प्रयत्नात सहा विद्यार्थी संयुक्त गट ब पूर्व परीक्षेत उत्तीर्ण)

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

एमपीएससी परीक्षेत श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्विसेसच्या विजयी घोडदौडीला सुरुवात.. 

(पहिल्याच प्रयत्नात सहा विद्यार्थी संयुक्त गट ब पूर्व परीक्षेत उत्तीर्ण)

इचलकरंजी :
 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.  या परीक्षेत इचलकरंजी येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्विसेसचे सहा विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेस पात्र झाले. ग्रामीण भागातील मुला-मुलींना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुणे व मुंबई यासारख्या मोठ्या शहरात जायला लागू नये, त्यांना त्याच भागात या परीक्षेच्या तयारीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी व सुविधा मिळाव्यात या भावनेने सदर इन्स्टिट्यूटची वर्षभरापूर्वीच स्थापना झालेली आहे.  अल्पावधीतच या इन्स्टिट्यूटमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश मिळवत यूपीएससी /एमपीएससी परीक्षेच्या नव्या श्रद्धा पॅटर्नची ओळख करून दिली.  खऱ्या अर्थाने जेईई व नीट परीक्षेच्या उज्वल निकालांबरोबरच स्पर्धा परीक्षेच्या उच्चांकी निकालाची विजयी घोडदौड श्रद्धा इन्स्टिट्यूटने सुरू केल्याचे या निकालाने पाहायला मिळते. कोणतेही कार्य हाती घेताना प्रबळ आत्मविश्वास, धैर्य, अभ्यासूवृत्ती आपल्या अंगी असणे आवश्यक आहे.  भविष्यात श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्विसेसच्या माध्यमातून उच्च व प्रामाणिक अधिकारी घडतील, सर्व स्पर्धा परीक्षेत श्रद्धा इन्स्टिट्यूट नवा अध्याय मांडत घवघवीत यश मिळवेल असे मत संस्थेचे अध्यक्ष श्री. ए.आर.तांबे सर यांनी व्यक्त केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना  संस्थेचे अध्यक्ष श्री. ए.आर.तांबे, समन्वयक श्री.एम.एस. पाटील,  सौ. संगीता पवार, सौ. सुप्रिया कौंदाडे, श्री.अभिषेक तांबे, सौ. सृष्टी तांबे, सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा