डीकेटीईमध्ये एमबीए सीईटी २०२६ तयारीसाठी मोफत मार्गदर्शन शिबीर
इचलकरंजी:
डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटच्या एमबीए विभागातर्फे एमबीए सीईटी २०२६ तयारीसाठी दोन दिवसीय मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा डीकेटीईमध्ये १ व २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.४५ ते २.०० या वेळेत एमबीए सेमिनार हॉल मध्ये भरिवण्यात येणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता प्रथम वर्ष एमबीए प्रवेशासाठी आवश्यक असणारी ‘एमबीए सिईटी २०२६’ अंतर्गत येणा-या क्वॉटीटेटिव्ह अॅप्टीटयूट, व्हर्बल अॅबिलीटी, रिडींग कॉम्प्रीहेन्शन, लॉजीकल अॅण्ड अॅबस्ट्रॅक्ट रिझनींग या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासोबत प्रश्नपत्रिकेची रचना, वेळेचे प्रभावी व्यवस्थापन, शॉर्टकट तंत्रे तसेच मॉक टेस्टद्वारे प्रत्यक्ष सराव यावरही विषेश भर दिला जाणार आहे. अनुभवी व तज्ञ प्राध्यपकांच्याद्वारे मार्गदर्शन मिळणार असल्याने एमबीए इच्छुक विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या आयोजनाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन डीकेटीईचे डायरेक्टर प्रा.डॉ.सौ.एल.एस. आडमुठे व विभागप्रमुख डॉ पी.एस.जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी प्रा.व्ही.आर.पाटील, मोबाईल नंबर – ९९७०३९२२७८, प्रा.डॉ.व्ही.एस.गुरव- ९८३४४९११८६ यांच्याशी संपर्क साधावा.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







