ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत बंद पॉवरलूम कारखान्यातून ४२ हजारांच्या ६ बॅटऱ्या चोरीस

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत बंद पॉवरलूम कारखान्यातून ४२ हजारांच्या ६ बॅटऱ्या चोरीस

इचलकरंजी :
 कबनूर परिसरातील दावतनगर येथील बंद पडलेल्या पॉवरलूम कारखान्यातून अज्ञात चोरट्याने ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिनेश बाबासो बलवान (वय ३७, व्यवसाय कारखानदार) यांच्या दावतनगर गल्ली क्रमांक ५, कबनूर येथील बंद कारखान्यात दि. ३० मार्च २०२६ रोजी रात्री ११ ते ३१ मार्च सकाळी ८ या कालावधीत चोरी झाली. अज्ञात चोरट्याने कारखान्याच्या बाहेरील बाजूस खिडकीत ठेवलेल्या चावीचा वापर करून कुलूप उघडत आत प्रवेश केला.
यानंतर चोरट्याने एक्साईड व अॅमरॉन कंपनीच्या विविध क्षमतेच्या एकूण सहा बॅटऱ्या चोरून नेल्या. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ४२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ इंदुलकर करत असून, पोलीस निरीक्षक शिवाजी मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा