इचलकरंजी मनपा लोकशाही दिनात ११ अर्ज दाखल
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महानगरपालिका स्तरीय लोकशाही दिनामध्ये विविध विभागांशी संबंधित एकूण ११ अर्ज दाखल झाले. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
या अनुषंगाने आयुक्त पल्लवी पाटील यांच्या निर्देशानुसार आणि उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी अशोक कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार (दि. ६ एप्रिल) रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हा लोकशाही दिन पार पडला.
या लोकशाही दिनात बांधकाम विभागाकडे २ अर्ज, नगररचना विभागाकडे ५ अर्ज, आरोग्य विभागाकडे २ अर्ज आणि शिक्षण विभागाकडे २ अर्ज असे एकूण ११ अर्ज नागरिकांकडून दाखल करण्यात आले.
कार्यक्रमास सहायक आयुक्त (आस्थापना) सुनील शिंदे, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, भांडार अधीक्षक सुजाता दाभोळे, सहायक नगररचनाकार अविनाश बन्ने, अजय जाधव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





