ICHMH51NEWS.IN
9921600800

श्री बसवेश्‍वर पत संस्थेला 94.26 लाखाचा नफा :  प्रकाश दत्तवाडे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्री बसवेश्‍वर पत संस्थेला 94.26 लाखाचा नफा :  प्रकाश दत्तवाडे

इचलकरंजी
येथील सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या श्री बसवेश्‍वर नागरी सहकारी पत संस्थेस नुकत्याच संपलेल्या सन 2025-26 या आर्थिक वर्षात 94 लाख 26 हजार रुपये इतका निव्वळ नफा झाला असल्याची माहिती चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांनी दिली. सभासद, ठेवीदार आणि हितचिंतक यांच्या विश्‍वास आणि आशिर्वादाच्या बळावर संस्थेची यशस्वी घोडदौड सुरु असल्याचे श्री. दत्तवाडे यांनी सांगितले.
ते म्हणाले, संस्थेचे खेळते भांडवल 21 कोटी 11 लाख असून वसुल भाग भांडवल 64 लाख 8 हजार रुपये असून राखीव व इतर निधी 3 कोटी 70 लाख इतका आहे. संस्थेच्या एकूण ठेवी 14 कोटी 7 लाख इतक्या असून येणे कर्ज 12 कोटी 27 लाख आहे. संस्थेने एकूण गुंतवणूक 7 कोटी 17 लाख इतकी केलेली आहे. सर्व तरतूदी वजाजाता संस्थेस  94 लाख 26 हजार इतका निव्वळ नफा झालेला आहे. संस्थेचा एनपीए शून्य टक्के असून संस्थेला सातत्याने ऑडीट वर्ग अ मिळत आला आहे. संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरु झाले असून गत 49 वर्षे संस्था इचलकरंजी व परिसरातील लहान-मोठ्या उद्योग व्यापारांना आर्थिक पुरवठा करीत आहे. संस्थापक कै.ज्ञानबा दत्तवाडे यांच्या आशिर्वादाने आणि सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या सहकार्याने संस्थेने प्रगतीचा आलेख उंचावत ठेवला असल्याचे श्री. दत्तवाडे यांनी सांगितले.
यावेळी व्हा. चेअरमन दत्तात्रय कुंभोजे, संचालक सर्वश्री निवृत्ती गलगले, अशोक चनविरे, मलगोंडा पाटील, चंद्रकांत माळी, अ‍ॅड. वैभव हावळे, संदीप तोडकर, हर्षल माने, महेश वाली, सौ. सुरेखा दत्तवाडे, श्रीमती सरस्वती माळी, सुशांत देवनाळ आदींसह चिटणीस बंडू माळी व कर्मचारी उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा