ICHMH51NEWS.IN
9921600800

बालाजी विद्या मंदिरचा CIS चषक 2026 बुद्धिबळ स्पर्धेत उल्लेखनीय यश

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बालाजी विद्या मंदिरचा CIS चषक 2026 बुद्धिबळ स्पर्धेत उल्लेखनीय यश

इचलकरंजी :
चेस असोसिएशन इचलकरंजी यांच्या मान्यतेने केन चेस अकॅडमी, मास्टर चेस अकॅडमी आणि लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित CIS चषक 2026 निमंत्रित जलद बुद्धिबळ स्पर्धेत बालाजी विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेत राज गावडे याने द्वितीय क्रमांक पटकावत आकर्षक ट्रॉफी आणि ५०० रुपयांचे पारितोषिक मिळविले. इयत्ता तिसरी गटात गुलामजिलानी मुल्ला याने प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल पटकावले. इयत्ता पहिली गटात साई देवरकर याने द्वितीय क्रमांक मिळवत सिल्व्हर मेडल जिंकले. तसेच शाळेतील उत्कृष्ट बुद्धिबळ खेळाडू म्हणून संकेत घोलपे याला उत्तेजनार्थ गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले.
याशिवाय उत्कर्ष गौंड, राजेश्वरी गौंड, स्पृहा चव्हाण, मयुरेश डिगोले, हर्षल अडूरकर, विश्वजित गायकवाड, समृद्धी कात्रे आणि हर्ष गायकवाड या विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या एकत्रित यशामुळे बालाजी विद्या मंदिरला “बेस्ट चेस स्कूल” या मानाच्या ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बुद्धिबळ प्रशिक्षक रोहित पोळ सर यांचे मार्गदर्शन लाभले असून मुख्याध्यापिका निशा सुर्यवंशी मॅडम यांचे प्रोत्साहन लाभले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा