ICHMH51NEWS.IN
9921600800

कडक उन्हामुळे सिग्नल बंद ठेवण्याची मागणी; नागरिक मंचचे निवेदन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कडक उन्हामुळे सिग्नल बंद ठेवण्याची मागणी; नागरिक मंचचे निवेदन

इचलकरंजी :
सध्या राज्यभर तीव्र उष्णतेची लाट सुरू असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरातील सिग्नल यंत्रणा दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाळा संपेपर्यंत बंद ठेवण्यात यावी, अशी मागणी इचलकरंजी नागरिक मंचाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन शहर वाहतूक शाखेकडे पीएसआय किरण कांबळे यांना देण्यात आले. कडक उन्हात सिग्नलवर थांबावे लागल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांना त्रास होत असल्याने हा निर्णय घेण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी उमेश पाटील, अमित बियाणी, महेंद्र जाधव, जतीन पोतदार, राजू कोन्नुर, सुहास पाटील, लक्ष्मीकांत खंडेलवाल, सुषमा साळुंखे, अभिजित पटवा आदी उपस्थित होते.
शहर वाहतूक शाखेत निवेदन देताना इनामचे सदस्य

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा