ICHMH51NEWS.IN
9921600800

६ वर्षांच्या प्रिशा पटेलची ‘ब्लॅक बेल्ट’ कामगिरी; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

६ वर्षांच्या प्रिशा पटेलची ‘ब्लॅक बेल्ट’ कामगिरी; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

इचलकरंजी :
अवघ्या सहा वर्षांच्या वयात ‘ब्लॅक बेल्ट’ मिळवत इचलकरंजीतील प्रिशा कश्यप पटेल हिने ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड २०२६’मध्ये देशातील सर्वात कमी वयाची मार्शल आर्ट ब्लॅक बेल्ट म्हणून नोंद केली आहे. तिच्या या यशामुळे वस्त्रनगरीचा लौकिक उंचावला आहे.
लहान वयातच कराटेची आवड निर्माण झालेल्या प्रिशाने तीन वर्षांच्या सातत्यपूर्ण सरावातून ही कामगिरी साध्य केली. ज्युनिअर गटातील यलो, ऑरेंज, ग्रीन व ब्ल्यू बेल्टनंतर सिनीअर गटातील पर्पल व ब्राऊन बेल्टही तिने यशस्वीरित्या मिळवले. मे २०२५ मध्ये झालेल्या ब्लॅक बेल्ट परीक्षेसाठी निवड झाल्यानंतर तिने दहा दिवसांच्या कठोर सराव शिबिरात सहभाग घेत अंतिम यश मिळवले.
प्रिशा सध्या तिळवणी येथील रॉयल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता पहिलीत शिकत असून तिच्या यशामागे पालकांचे मोठे योगदान आहे. प्रशिक्षिका किरण चौगुले व ग्रॅण्डमास्टर रविकिरण चौगुले यांचे तिला मार्गदर्शन लाभले. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध मान्यवरांनी अभिनंदन केले असून शहरात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा